top of page

विरहाच्या दुःखातून मुक्त कसे व्हावे?

Sep 11, 2022
2 min read

प्रश्न : जवळच्या व्यक्तीच्या मृत्यूच्या दुःखातून कसे बाहेर पडावे? असे वाटते की आयुष्य संपले आहे. कोणत्याच गोष्टी मध्ये आनंद वाटत नाही. जीवन जगायचे म्हणून जगतोय. यातून कसे बाहेर पडावे आणि पुढील जीवन कसे जगावे यावर मार्गदर्शन करावे.


उत्तर: आपले नातलग आता जिवंत नाहीत हे वास्तव आहे.


आपणास त्यांची आठवण सतावत आहे. आठवण हा फक्त भ्रम आहे ते वास्तव नाही.


जीवनात जे अनुभवता येते आणि जीवनावश्यक असते अशा वास्तव गोष्टींना पकडुन राहायचे असते ( योग करायचा असतो ). आणि जे आता अनुभवता येत नाही ते भ्रम / Illusion आहे, अनावश्यक आहे त्यांचा त्याग करायचा असतो.


काय पकडायचे आणि काय सोडायचे याचे आकलन होण्यासाठी विवेक ज्ञान आवश्यक असते.


जीवनात विवेक ज्ञान येण्यासाठी अज्ञानाचा त्याग करावाच लागतो.


सर्व प्रकारच्या श्रद्धा / अंध श्रद्धा हे वास्तवात काहीच नसतात, तो फक्त भ्रम असतो.


सर्व श्रद्धा या भूतकाळातील आठवणी असतात, त्यामुळे त्या भ्रामक असतात, त्यामध्ये तथ्य / वास्तव नसते. आठवणी / memories are dead things. याचे खोलवर आकलन झाले तर सर्व दुःखातून तत्क्षणी मुक्तता मिळते.


ज्या श्रद्धा स्थानांचे आपण श्राद्ध घालतो त्यांना विसरायचेच असते. परंतु त्यांना विसरता का येत नाही? कारण आपल्या मनास त्या आठवणीमध्ये जास्त भक्कम आधार मिळत असतो. विरहाच्या अति दुःखात मनाला इतर कोणीही मदत करू शकत नाही म्हणून ते पूर्व स्मृतींना सतत आळवित राहते. अशा परिस्थितीत इतर कोणाचे मार्गदर्शन उपयोगी पडत नाही की काही प्रयत्न करून मन शांत होत नसते.


पूर्ण हतबल आणि एकाकी झालेले असे मन मग जे काही जीवनातील सत्य आहे त्याचे आकलन करण्यास तेव्हाच खऱ्या अर्थाने समर्थ बनत असते. कारण त्याचा अहंकार आणि त्याचा मी पना क्षीण झालेला असतो.


परंतु जर त्याने इतर भ्रामक गोष्टींचा आधार घेतला तर परत तो त्या भ्रमाच्या चक्रात सापडू शकतो. मानवी मन जेव्हा वास्तवाचा सामना करू शकत नाही तेव्हा ते श्रद्धा स्थानांचा आधार घेवू लागते. मानवाच्या अज्ञानातून त्याने आत्मा, परमात्मा, ब्रम्ह अशा संकल्पना निर्माण केल्या आहेत, वास्तवात तसे काहीच नसते.


सर्वकाही हरवलेले एकाकी मन भ्रामक श्रद्धा कडे जर वळले नाही तर ते मन शांत होवू शकते. अशा शांत मनास बोध होवू शकतो की जाणण्या सारखे तसे काहीच नसते !!!


समाजाने निर्माण केलेल्या श्रद्धा असोत की अंधश्रद्धा असोत त्यांचा त्याग करणे अतिशय अवघड असते कारण आपण स्वतःसुद्धा त्याच समाजाचा एक भाग असतो आणि त्यांच्या शिवाय जगण्याची आपली तयारी नसते !!!


- J Krishnamurti यांच्या शिकवणुकीचा आधार

 
 
 

Comments


Mobile Phone: 9987145556, email: viyoddha@gmail.com

©2022 by Viyoddha. Proudly created with Wix.com

bottom of page