वैराग्य पेक्षा आसक्ती समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे.
जीवन जगताना जे प्रत्यक्ष कार्य होत असते तेच खरे कर्म असते. परंतु आपले विचार स्वतःच्या परस्परविरोधी भ्रामक कल्पना निर्माण करतात ज्या विरोधाभासी असतात आणि त्यामुळे आपल्या प्रत्येकाच्या जीवनात मोठे दुःख आणि संघर्ष निर्माण होत असतो. मानवी विचार हेच आपल्या दु:खास कारणीभूत असतात याची बहुतेकांना कल्पना सुद्धा नसते.
जीवनावश्यक गरजांची पूर्तता करणारे विचार सोडून इतर सर्व विचार आपले मन त्याच्या एकलेपणातून बाहेर पडण्यासाठी करत असते कारण आपल्या मनाला एकटे राहणे आवडत नसते. जेव्हा हे अनावश्यक विचार त्याच्या कल्पनां साठी कृती करते तेव्हा संघर्ष अटळ असतो कारण मानवी विचार हे स्वतः मूलतः खंडित असतात.
विचार ही एक भौतिक प्रक्रिया आहे कारण ते भौतिक मेंदूमध्ये साठवलेल्या भूतकाळातील माहिती संग्रहाचा प्रतिसाद असतात. विचारांची मुळे हि नेहमी भूतकाळात असतात, माहिती म्हणून स्मृतीमध्ये ती साठवलेली असतात. परंतु विचार त्याचा हा मूळचा भूतकाळ लपवतो आणि वर्तमान म्हणून प्रकट होतो आणि वर कालातीत अस्तित्व बाबत सुद्धा कल्पना करतो!!! भूतकाळातील विचारांनी कितीही कालातीत कल्पना केल्या तरीही ते केवळ विचारच असतात.
विचारातील ही मूलभूत तफावत त्यांनी निर्माण केलेल्या सर्व कल्पनांमध्ये सतत विभागणी निर्माण करतात. अनेक देवता, अनेक धर्म, अनेक जाती, अनेक देश हे सर्व विचारांनी बनले गेले आहेत आणि त्यांच्या अनुयाया मध्ये सतत त्यामुळेच संघर्ष होत असतो.
मानवी विचार व्यतिरिक्त असे काही आहे काय की ज्यामुळे मानवी संघर्ष होणार नाही?
हे जाणून घेण्यासाठी त्या व्यक्तीमध्ये अशी चौकशी करण्यासाठी वेगळी ऊर्जा असली पाहिजे !
नैसर्गिक किंवा वास्तविक सुद्धा अस्तित्व नसलेल्या सर्व वैचारिक कथा, कल्पना आणि श्रद्धा या मानवी चेतनेची सामग्री बनलेली आहे. या सामग्रीचे रूपांतरण झाले पाहिजे. जेव्हा चेतनेच्या सामग्रीमध्ये परिवर्तनाची प्रक्रिया घडू लागते तेव्हा ती वेगळी ऊर्जा निर्माण करते.
चेतनेच्या समग्र सामग्रीपासून मुक्त होण्यासाठी, विचारांनी तयार केलेल्या मानसिक कल्पना आणि आदर्श व्यक्ती विशेष पासून मन पूर्णपणे मुक्त असले पाहिजे. मनाने सर्व काल्पनिक अधिकारांचा (ईश्वर, गुरू, ग्रंथ, धर्म, संप्रदाय, समाज ई.) त्याग केला पाहिजे. आपल्या मानसिक वैफल्यातून आपणच अधिकारी निर्माण केले आहेत. जेव्हा मन स्वतःच्या जीवनात सुव्यवस्था आणते तेव्हा त्याला कोणत्याही अधिकाराची गरज नसते. म्हणून मन कोणत्याही तारणकर्त्यांशी किंवा कोणत्याही गुरूंशी किंवा कोणत्याही परंपरांशी जोडलेले नसावे. श्रध्दा नको, कल्पना नको, संकल्पना नको, आदर्श नको, कोणतीही मानसिक बांधिलकी नको. जे अस्तित्वहीन आहे ते नाकारून, जे खोटे आहे ते निकड न पाहता नकार देऊन मनुष्य आपल्या जीवनात सुव्यवस्था आणू शकतो.
वैराग्य पेक्षा आसक्ती समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे. आसक्ती मनाला एक विशिष्ट व्यस्तता देते, मन आसक्तीचा वापर स्वतःला व्यस्त राहण्यासाठी करत असते, म्हणूनच मन आसक्तीला धरून ठेवते. मनाला एकटेपणाची भीती वाटते म्हणून ते आसक्ती निर्माण करते.
चेतनेची सामग्री काढून टाकण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा आसक्त व्यवहार करताना व्यर्थ खर्च केली जाते. जेव्हा आपण आसक्त विषयात गुंतलेले असतो तेव्हा आपण आपल्या जीवनात आसक्ती मुळे निर्माण झालेले नुकसान पाहण्या इतके संवेदनशील नसतो किंवा डोळेझाक केली जाते.
विवेक ज्ञान ही खरी जीवन ऊर्जा आहे, ती मानवी विचार, कल्पना आणि आदर्शांनी प्रदूषित होत नाही. परंतु आसक्तीत गुंतले गेलेले मन त्याला प्रत्यक्ष भेटू शकत नाही.
विवेक ज्ञान हे विचारांच्या क्षेत्रात हुशारीने कार्य करते. विवेक ज्ञान हे उर्जा स्वरूप असल्याने ती व्यक्ती भौतिक विचार क्षेत्रात सुद्धा हुशारीने कार्य करू शकते. संपूर्णता किंवा समग्रतेच्या आकलनाशिवाय, कोणीही व्यक्ती स्वतःच्या जीवनात सुव्यवस्था आणू शकत नाही.
आपला मी हा विचारांनी निर्माण केलेला आहे, तो नेहमी भूतकाळात असतो आणि तो जे पाहतो ते नेहमीच विचार असतात. मी स्वतःच आसक्ती आहे, मी आणि मी याने निर्माण केलेल्या आसक्तीच्या कल्पना वेगळ्या नाहीत, तो केवळ स्मृतींचा भास आहे. ही अंतर्दृष्टी ज्याला प्राप्त होते त्याची आसक्ती विरक्ती मध्ये रुपांतरीत होते.
विचारांनी निर्माण केलेल्या आसक्तींना दिलेला नकार हाच विवेकी बुद्धिमत्तेचा शोध लावतो.
जे गंभीर आहेत ते अलिप्त होऊ शकतात, मुक्त होऊ शकतात, त्यांच्या मुळे मानवी चेतनेतील सामग्री बदलू शकते.


Comments