Real meditation - II
Dattaram Satpute: सर , छान article.
यामध्ये शेवटच्या वाक्याची गरज वाटत नाही..असे माझे मत आहे,ते चुकीचे निश्चितच नाही.
Thoughtless state म्हणजे विचारच येत नाही असा चुकीचा गैरसमज पसरलेला आहे त्यामुळे ते वाक्य मुद्दाम टाकले आहे.
माझ्याकडे एक फॅमिली राहायला आली होती. त्यांच्या वडिलांना 2005 मध्ये अर्धांगवायू झाला होता आणि त्यांची शारीरिक हालचाल बंद झाली होती. नंतर दोन वर्षानंतर त्यांना विस्मरण होवू लागले. 2007 पूर्वीची स्मृती त्यांना अधून मधून कळते म्हणून ते बायको आणि मुलांना ओळखतात. त्यांची स्मृती आता काही तासा पूर्वीच्या गोष्टी ओळखू शकत नाही. मुलांची लग्ने झाली, नातवंडे झाली तरी घरातील सुनांना आणि नातवंडांना ती नवीन कुटुंब सदस्य आपली आहेत असे ते ओळखीत नाहीत.
वडील त्रास देवू लागले तर मुले जुनी गाणी, भजने लावतात, ती गाणी किंवा भजने वडील व्यवस्थित गातात !
UG Krishnmurti असे सांगत की काही काम नसेल तर त्यांची स्मृती विचार करणे बंद करत असे आणि काही काम असेल तरच त्यांची स्मृती परत सुरू होत असे. दरम्यानच्या काळात ते शून्य अवस्थेत रहात असत.
आपण सर्वजण आपला मेंदू आणि स्मृती अखंड वापरत असतो, त्यामुळे त्या मधून सतत विचार चालू असतात. काही अपघाताने किंवा इतर काही शारीरिक कारणाने विचार करण्याची मेंदूची सवय कमी झाली तरच संपूर्ण शून्य अवस्था शक्य आहे, ती अवस्था कदाचित मेंदूची विकृती सुद्धा असू शकते.
संपूर्ण विस्मरण झालेल्या व्यक्ती स्वतःचे नाव, पत्ता लक्षात ठेवू शकत नाहीत. ते जर चुकून घरा बाहेर गेले तर परत घरी येवू शकतं नाहीत.
प्रत्येक जीवाच्या संरक्षण आणि संवर्धन यासाठी विचार हे आवश्यक असतात.
मानव प्राण्याचा झालेला अफाट विकास हा विचार करण्यामुळे झालेला आहे.
समस्या हिआहे की, जीवनावश्यक विचार ज्या मेंदू मध्ये तयार होतात त्याच मेंदू मध्ये अनावश्यक विचार सुद्धा तयार होत असतात.
जो पर्यंत जीवनाचे सत्य आकलन होत नाही तोपर्यंत अनावश्यक विचार टाळता येत नाहीत. आणि अनावश्यक कल्पना टाळल्या तरच जीवनाचे सत्य आकलन होवू शकते अशी परस्परावलंबी गुंतागुंत झालेली आहे.
आपल्या पूर्वीच्या पिढ्यांनी त्यांच्या अज्ञानात ज्या अनावश्यक कल्पना निर्माण केल्या आहेत त्यांची आता श्रद्धा स्थाने निर्माण झाली आहेत. पुढील पिढ्या कितीही सुशिक्षित झाल्या तरी त्यांच्या सुद्धा मागील पिढ्यांची घोडचूक लक्षात येणे अशक्य झाले आहे.
जो पर्यंत जे अनावश्यक आहे ते अनावश्यक आहे याचे आकलन होत नाही तो पर्यंत मन अनावश्यक गोष्टीकडे धाव घेत राहते, मन अशा अनावश्यक गोष्टी choose करत राहते.
जे आवश्यक आहे ते choose करावे लागते फक्त जे अनावश्यक आहे ते टाळणे म्हणजे choiceless awareness असे म्हणता येईल.
ती स्थिती येण्यासाठी मनाला त्या अवस्थेत जावे लागते.
Choiceless awareness / निरपेक्ष निरीक्षण कोणीही करू शकत नाही, त्या अवस्थेत गेल्या नंतर ते शक्य होते.
त्या अवस्थेत जाण्यासाठी there must be ORDER in Life.
जीवनात order येण्यासाठी जीवनात जी काही disorder आहे ती जावी लागते.
जेव्हा जीवनात order येते तेव्हा observer is observed याचा प्रत्यय येतो. या मध्येच मी म्हणजे नेमके काय आहे याचे आकलन होते.
Order in life, self realisation, state of choiceless awareness हे एकाच स्थितीची वेगवेगळी अंगे आहेत असे समजले तर चुकीचे ठरणार नाही.
Choiceless awareness हि मनाची उन्मनी अवस्था आहे. या अवस्थेत स्थित होण्यासाठी जीवन सुव्यवस्थित असणे आवश्यक आहे.
जीवन सुव्यवस्थित होण्यासाठी जीवनात कोणत्याही psychological images of relationships, bondages असता कामा नयेत. कारण images and bondages are part of disorder.
Freedom from all known images is must to remain in choiceless state of mind. Mind should not have any option left to choose from.
प्राचीन संत, गुरू, सद्गुरू, ग्रंथ, संप्रदाय, धर्म, मंत्र, तंत्र, साधना, समाज, कुटुंब हे सर्व मानसिक प्रतिमा आहेत, त्या आपल्या जाणिवेतील एक एक घटक आहेत.
जाणीवेतून एक एक घटक काढत संपूर्ण आयुष्य जावू शकते म्हणून संपूर्ण जाणीव हाच एक भ्रम आहे याचे आकलन झाले तर जाणीवेतून सर्व घटकांचा विलय तत्क्षणी होतो, यालाच कृष्णमूर्ती हे freedom from all known असे म्हणत असत.
जाणीवेतून सर्व घटक गेले तर मग जीवनात काय शिल्लक राहते? जीवनाचे ध्येय काय? असे जीवन कोण जगेल?
जोपर्यंत जीवनात वरील पैकी काहीतरी choice शिल्लक आहे तो पर्यंत Choiceless होणे शक्य नसते.
जसे सर्व शास्त्रे शिकून झाल्या नंतर ती टाकून द्यावी लागतात (unlearning) तसेच सर्व भोग भोगून झाल्या नंतर आकलन होते की त्यामध्ये काही अर्थ नाही. सर्व प्रकारचे भोग हिच disorder आहे याचे आकलन झाले तरच त्या भोगातून सुटका शक्य आहे, भोग सुटणे किती अशक्य आहे हे सांगणे न लगे.
भोगातून निसटलेलं तृप्त, समाधानी मन मग choiceless awareness या अवस्थेत जाऊ शकते.
त्या नंतर त्याच्या कडून काही कार्य झाले तर ते त्याच्या एकट्यासाठी नसते त्यातून इतरांना मदत होत असते.




सुंदर विवेचन,