top of page

Relationships

Mar 10, 2023
3 min read

In our relationships there is division and conflicts, it is the living fact of life and generally we have accepted it. We don't want to talk about it so we have invented and talk about Gods and other fanciful things, right?


Is this Love?


Why do our own people hurt us more? What is the thing that gets hurt? Is it a physical hurt or a psychological heart?

Is it the idea about yourself that gets hurt?


Ask these questions and find out yourself.


As long as that Idea of yourself is there it will get hurt again and again.

Why do we have idea of ourself which is just pictures and images? Because we have identified ourselves with those pictures and images. Without those pictures and images we are nothing and we are afraid to be nothing. We Always wants to become something so we keep adding more and more pictures and images.


To avoid pains and fears in relationship can we stop creating more pictures and images?


There is only one image maker who creates many other pictures. He is our I or Me, simply a thought. This I thought is not different from his images. I and images he creates are all part of memory. When we experience anything, our brain stores that information in memory. The response of memory is our I thought and to remain alive he creates many other images and keeps chatting continuously.


There is only a relationship between our own image and others images created by our I. Actually we are humans but our I has created images and kept us limited to these images. In actual life there is no relationships, this illusion of relationships is created by our I.


नातेसंबंध


आपल्या सर्वांच्या नात्यांमध्ये विभागणी आणि संघर्ष आहेत, हे जीवनाचे जिवंत सत्य आहे आणि सामान्यतः आपण ते स्वीकारले आहे. फक्त आपण त्याबद्दल बोलू इच्छित नाही म्हणून कदाचित आपण देव आणि इतर काल्पनिक गोष्टींबद्दल बोलत असतो, बरोबर?


हे खरे प्रेम आहे काय?


आपलीच माणसं आपल्याला जास्त का दुखवतात? हे दुखणे म्हणजे नेमके काय असते? हि शारीरिक इजा आहे की मानसिक तणाव आहे? नेमके कोण दुखावले जात असते? स्वतःबद्दलच्या केलेल्या कल्पना दुखावल्या जातात का?


हे प्रश्न स्वतःला विचारा आणि स्वतःच शोध घ्या. इतर कोणीच मदत करू शकत नसते. कारण सर्वच यात अडकले गेलेले आहेत.


जोपर्यंत स्वतः बद्दलची कल्पना आहे तोपर्यंत ती कल्पना पुन्हा पुन्हा दुखावली जात रहात असते.


आपली स्वतःची जी कल्पना आहे ती फक्त मानसिक प्रतिमा आहे दुसरे काही नाही. कारण काही माहिती आणि प्रतिमांमधून आपण आपली स्वतःची ओळख तयार करून घेतली आहे. त्या चित्रांशिवाय आणि प्रतिमांशिवाय आपण काहीही नाही आणि आपल्याला काहीही नसण्याची भीती वाटते. आम्हाला नेहमी काहीतरी बनायचे आहे म्हणून आम्ही अधिकाधिक चित्रे आणि प्रतिमा जोडत राहतो.


नात्यातील वेदना आणि भीती टाळण्यासाठी आपण अधिक चित्रे आणि प्रतिमा तयार करणे थांबवू शकतो का?


एकच प्रतिमा निर्माता आहे जो इतर अनेक चित्रे तयार करतो. तो आपला मी आहे, तो फक्त एक विचार मात्र आहे. मी हा विचार त्याच्या प्रतिमेपेक्षा वेगळा नाही. मी आणि त्याने निर्माण केलेल्या प्रतिमा हे सर्व स्मृतीचे भाग आहेत. जेव्हा आपण काहीही अनुभवतो तेव्हा आपला मेंदू ती माहिती स्मृतीमध्ये साठवतो. स्मृतीचा प्रतिसाद हाच मी नामक विचार आहे आणि जिवंत राहण्यासाठी तो इतर अनेक प्रतिमा तयार करतो आणि सतत त्यांच्याशी गप्पा मारत राहतो.


आपली स्वतःची प्रतिमा आणि आपल्या मी द्वारे तयार केलेल्या इतर प्रतिमांमध्ये फक्त मानसिक संबंध असतात. खरं तर आपण सर्व माणसं आहोत पण आपल्या मी याने ज्या मानसिक प्रतिमा तयार केल्या आहेत त्यांनी आपल्याला या प्रतिमांपुरते मर्यादित ठेवले आहे, त्यांच्या बंधनात अडकवले आहे.


वास्तविक जीवनात नाती नसतात, नात्यांचा हा भ्रम आपल्या मी याने निर्माण केला आहे. मी नसेल तर विचार नसतात, प्रतिमा नसतात, नाती नसतात.



Recent Posts

See All
Truth can not be experienced.

Insight is not an experience. Experience implies the center of Me and insight implies no center. Meditation is not a deliberate act....

 
 
 

Comments


Mobile Phone: 9987145556, email: viyoddha@gmail.com

©2022 by Viyoddha. Proudly created with Wix.com

bottom of page