Religions protect the animality in man !!!
In the search for power, we are escaping a deep sense of frustration and fear – fear of life, fear of being uncertain, fear of death, fear of non-existence, and the fear which has been instilled in us through the organised religions of belief.
Whether Christianity, Hinduism, or any other organised so-called religious movements, they have always created a sense of apprehension, a sense that you have to be saved by an external power, symbolised in a human being or in certain ideas.
This fear has created in man – who is after all the result of centuries of development from the animal, and is still the animal – a sense of fear, which has been inculcated and sustained.
J. Krishnamurti, From an Interview by Donald Ingram Smith, New Delhi, 24 December 1966
धर्म हे माणसातील पाशवि वृत्तीचे एकप्रकारे संरक्षण करत असतात !!!
इतरांवर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या प्रयत्ना साठी आपल्या मधील खोल निराशा आणि भीती यातून आपणास बाहेर यावे लागते. मृत्यू, रोग, जीवनातील अशाष्वतता या बरोबरच प्रस्थापित धर्म आणि त्यांची श्रद्धा स्थाने यांनी सुद्धा मानवात भीतीची बीजे खोलवर रोवली आहेत.
जगातील ख्रिश्चन धर्म असो, हिंदू धर्म असो किंवा इतर कोणत्याही प्रस्थापित धार्मिक चळवळी असोत, त्यांनी नेहमीच भीतीची भावना निर्माण केली आहे. भीतीची भावना अशासाठी निर्माण केली जाते की त्यामुळे आपल्याला देवा सारख्या बाह्य शक्तीपासून किंवा विशिष्ट धार्मिक कल्पनांमुळे, किंवा धार्मिक प्रतिका द्वारे वाचता येते असे दाखविले जाते.
ही भीती माणसामध्ये निर्माण झाली आहे कारण प्राण्यांच्या शतकानु शतकांच्या उत्क्रांतीचा तो स्वतः एक परिणाम आहे आणि मानव अजूनही पशू आहे. त्यामुळे पशुमधील सहज असणारी भीतीची भावना त्याच्या मध्ये अजून टिकून आहे.
Survival of the fittest हा उत्क्रांतीचा सिद्धांत आहे. साहजिक जे सामर्थ्यशाली आहेत ते वर्चस्व वादी असतात.
जगण्याच्या संघर्ष पायी काम, क्रोध इत्यादी षड विकार सर्व जीवात निर्माण होत असतात, हे पशुत्वाचे लक्षणच आहे. देश, धर्म हे सुद्धा संरक्षणाचे हत्यार म्हणून वापरले गेले आहेत. स्वतःच्या संरक्षणासाठी इतरांचा बळी योग्य ठरविण्याचे काम धर्म आणि देश या संकल्पनेने मानवात खोलवर रुजवलेले आहे.
संरक्षणासाठी निर्माण केलेल्या देव, देश, धर्म सारख्या मानसिक कल्पनांमुळे मानवी संरक्षण धोक्यात आलेले आहे याचे आकलन झालेल्या व्यक्ती मधून भीती हद्दपार होते.




Comments