अमरत्व
जगात जे जे काही जन्माला येते त्यांचा मृत्यू निश्चित असतो. यामुळे जग हे विनाशी आहे. यासाठी वेदांतात जगाला मिथ्या असे म्हटले जाते.
असे असूनही अमर बनण्याची कल्पना पारंपरिक शास्त्रांनीच पुढे आणली. अमृत पिल्या मुळे देव अमर झाले आणि मानवाला अमृत मिळाले नाही म्हणून तो मर्त्य बनला असे पुराणात सांगितले गेले आहे.
जग हे नश्वर आहे, ते दुःखानी भरलेले आहे. जे जीवन मिळाले आहे त्यामध्ये असंख्य अडचणींना सामोरे जावे लागते. तरीही तसेच जीवन अखंड जगायला मिळावे, परत परत जन्म मिळावे, पुनर्जन्म मिळावा यासाठीचा अट्टाहास मूर्खपणाचा नव्हे काय?
आपण विचार करायला लागलो की काहीही मानसिक कल्पना तयार करतो. आणि त्या मानसिक कल्पनांचे कोणीतरी भांडवल करून त्याची विक्री सुरू करतो. अज्ञानी भक्त त्यांची गिऱ्हाईक बनतात.
मुक्ती, स्वर्ग, पुनर्जन्म, अमरत्व, देव, असुर सारख्या कल्पना या अशा विकृत विचारातून तयार झालेल्या आहेत.
आम्हा घरी धन, शब्दांचीच रत्ने ।
शब्दांचीच शस्त्रे, यत्न करू।।
शब्दची आमुच्या जीवाचे जीवन।
शब्दे वाटू धन, जनलोका।
तुका म्हणे पहा, शब्दचि हा देव।
शब्दचि गौरव, पुजा करू।।
One can think about Immortality. But it is still The content of consciousness. - Jidu Krishnamurti




Comments