संगणकीय मन
जे कृष्णमूर्ती, Dr David Bohm आणि दुसरे शास्त्रज्ञ यांच्या मधील इंटरनेट येण्या अगोदरची हि चर्चा असावी.
मानव प्राणी जसा विचार करतो तसाच संगणक सुद्धा विचार करू शकतो. परंतु सत्य हे मानवीय आणि संगणकीय विचार यांच्या पलीकडे असते. मानव प्राणी जसा पारंपरिक विचारांनी संस्कारित झालेला असतो तसेच संगणक सुद्धा त्यांना जसे प्रोग्रॅम केले जाते तसे ते विचार करू लागतात.
सत्य आकलन होण्यासाठी मानवी विचार आणि संगणकीय विचार हे दोघे मदत करणार नसतील तर इतर कोणता मार्ग आहे?
Insight / अंतर्दृष्टि हि विचार रहित दृष्टी असते आणि केवळ त्याच्या साहाय्याने सत्य आकलन होवू शकते.
Insight अंतर्दृष्टि कशी प्राप्त करावी किंवा ती कोणत्या अवस्थेत संभव आहे?
विचार करून सत्य अवस्था प्राप्त करता येत नाही. विचार रहित शांत अवस्थेत अंतर्दृष्टि मार्फत सत्य अवस्थेचे आकलन शक्य असते.
ज्याला सत्य अवस्थेचे आकलन झालेले असते तो इतरांना मार्ग दाखवू शकतो जर ती अवस्था प्राप्त करण्याची त्यांची तळमळ असेल तर. इतरांनी त्यांच्या वर झालेले मानवी विचारांचे संस्कार हटविण्याचा प्रयत्न केला तर त्यांना सुद्धा सत्य अवस्थेचे आकलन होवू शकते.
संगणक मध्ये जो पर्यंत प्रोग्रॅम असतात तोपर्यंत तो त्या प्रमाणे विचार करत राहणार तसेच मानवी मेंदू मध्ये सुद्धा जो पर्यंत मानसिक कल्पनांचे संस्कार शिल्लक आहेत तो पर्यंत मानवी मेंदू सुद्धा काल्पनिक विचार करत राहणार.
Anyone who wants to have insight must stop acting like computer.



Comments