top of page

समस्या सत्य नसतात

Feb 11, 2023
1 min read

सर्व मानवी समस्या ह्या मानसिक समस्या असतात म्हणून त्या खऱ्या नसतात, म्हणजे मुळात समस्या ह्या नसतातच !!!


जी व्यक्ती त्याच्या जीवनात सतत सावधान असते म्हणजे फक्त त्याच्या भौतिक जीवनाशी एकरूप झालेली असते ती व्यक्ती मानसिक भावनांच्या आहारी जात नाही. त्यामुळे ती दुःखी होऊ शकत नाही.


या उलट ज्या व्यक्ती भावना प्रधान असतात त्या त्यांच्या भौतिक जीवनात सावधान नसतात, त्यांचे प्रत्यक्ष जे जीवन आहे त्यापेक्षा वेगळ्या मानसिक विश्वात त्या वावरत असतात आणि ते मानसिक विश्व सत्य नसल्यामुळे त्यातील अपयशाने ते दुःखी होत राहतात.


मानसिक विश्वाचा त्याग करून भौतिक जीवनात सतत सावधान असणे म्हणजे खरे ध्यान असते.


Meditation म्हणजे असे अखंड ध्यान असते ज्यामध्ये आपले लक्ष सतत सावधान असते, ते मानसिक यश अपयशाने विचलित होत नाही.


आपली सर्व नाती गोती हि मानसिक बंधने असतात. सर्वात जास्त आवडणारी नाती सुद्धा सर्वात जास्त दुःख देऊन जातात. त्या नात्यामधून आपणास अधिक काहीतरी मिळेल या आशेने ते बनले गेलेले असते. काही अपघाताने ते नाते संपुष्टात आले तर त्याचा खूप मोठा धक्का बसत असतो.


एखाद्या व्यक्ती बाबतची स्मृती म्हणजे नाते असते. स्मृती नसेल तर नाते नसते. सर्व प्रकारच्या स्मृती ह्या भूतकाळातील असतात. जे काही भूतकाळात होऊन गेलेले असते ते अगोदरच मृत झालेले असते. याचे आकलन झालेले मन सावध होते आणि सावध झालेले मन भूतकाळातील स्मृती मध्ये न रमता केवळ वर्तमानातील घटना मध्ये सतत लक्ष ठेवीत दुःखमुक्त होते.

Recent Posts

See All

Comments


Mobile Phone: 9987145556, email: viyoddha@gmail.com

©2022 by Viyoddha. Proudly created with Wix.com

bottom of page