top of page

आत्मसाक्षात्कार

Oct 9, 2022
3 min read

प्रश्न: सध्या मी ' साद देती हिम शिखरे' हे पुस्तक वाचत आहे. त्यात श्री शंकर महाराज म्हणतायत की, "मनात येणाऱ्या विचारांचे, बाहेरील आवाजांचे, भावनांचे, साक्षीभावाने, तटस्थ निरीक्षण, अवलोकन करा, बिना प्रतिक्रिया, न गुंतता, तुम्हास आत्मसाक्षात्कार निश्चित होईल," हे कसे काय घडेल व घडते? हे कृष्णमूर्ती यांच्या पद्ध्तीने समजावून सांगाल काय?


उत्तर: मुद्दाम निरीक्षण करणारा जो पारंपरिक जणांचा साक्षी असतो तो आपला ' मी ' हाच असतो. ' मी ' ज्याचे निरीक्षण करत असतो ते त्याचे दृश्य हे सुद्धा ' मी ' असतो.


हा ' मी ' आपल्या भूतकाळाच्या माहितीची प्रतिक्रिया असते.


भूतकाळाची प्रतिक्रिया = मी = साक्षी


त्यामुळे जो पर्यंत ' मी ' आहे तो पर्यंत ते ध्यान नसते.


आत्मसाक्षात्कार हि सुद्धा भूतकाळातील माहिती वर आधारित संकल्पना आहे.


साक्षी असणे आणि आत्मसाक्षात्कार होणे या दोन्ही मानसिक संकल्पना आहेत, भ्रामक आहेत.


कशावरून ?


यासाठी कृष्णमूर्ती यांचे द्रष्टा आणि दृष्य कसे एक आहे याचे आकलन होणे आवश्यक आहे.


प्रश्न: आत्मसाक्षात्कार म्हणजे मेंदूतील सर्व "स्मृती", zero होणे ना? मी आणि आत्मसाक्षात्कार यांचा काय संबंध आहे?


पारंपरिक सर्व शास्त्रांनी मी म्हणजे आत्मा आहे असे सांगितले आहे.


त्यांनी आत्म्याचा साक्षात्कार झाला की सर्व आकलन होते असे सांगितले होते.


आत्मसाक्षात्कार / self realisation याला बहुतेक सर्व धर्मात अनन्य साधारण महत्व प्राप्त झाले आहे.


जे अर्थेशु, कामेशु नाहीत असे ज्ञानी साधक हे केवळ आत्मसाक्षात्कार प्राप्त करण्यासाठी साधना करत असतात. आत्मसाक्षात्कार झाला की कळायचे काही शिल्लक रहात नाही.


उपनिषद - वेदांताने तत्त्वमसी, अहं ब्रह्मास्मि, अयम् आत्मा ब्रह्म, प्रज्ञानं ब्रह्म, सर्वं खल्विदं ब्रह्मम् असे सांगून आत्मा हाच परमात्मा आहे, दोघांचे स्वरूप सारखे आहे. म्हणजे आत्मसाक्षात्कार झाला की तेथेच ब्रम्ह साक्षात्कार असतो असे निर्देशित केले आहे.

पारंपरिक अध्यात्मात नेमके आपणास काय जाणणे आहे ते यावरून लक्षात येते. त्यांच्या मते,


ब्रम्ह किंवा परमात्मा याच्या मागे लागायची आवश्यकता नाही


आत्मा काय आहे हे माहीत नसते, त्याचाच साक्षात्कार करून घ्यायचा असतो.


आपण स्थूल देह किंवा सूक्ष्म देह ( मन, चित्त, बुद्धी, अहंकार ) नाही याचा म्हणजे नेती नेती याचा प्रत्यय यायला हवा.


पारंपरिक शास्त्रांनी ' ब्रम्ह सत्य, जगत मिथ्या ' असेही नमूद करून ठेवले आहे.


नेती नेती (वैराग्य) याचा प्रत्यय आला की जगत मिथ्या ठसले जाते आणि मग विवेक जागृत होवून फक्त ब्रम्ह सत्य उरते आणि तोच आत्मा आहे आणि त्याचा साक्षात्कार करून घेणे हेच फक्त शिल्लक राहते.


पारंपरिक अध्यात्मात आत्मसाक्षात्कार याला का महत्त्व प्राप्त झाले आहे त्याची वरील पार्श्वभूमी आहे.


याचे आकलन झाले तर मग आपण सत्याचे आकलन करून घेवू शकतो, म्हणजे आत्मसाक्षात्कार सुद्धा प्राप्त करून घेवू शकतो.


ज्ञात विश्वात पृथ्वी सोडून इतरत्र कोठेही जीवन नाही. पृथ्वी ग्रहावर अपघाताने जीवन तयार झाले आहे. ते कोणत्याही शक्तीने बनविले नाही. करोडो वर्षांच्या जडण घडणीत आताची जीवसृष्टी घडलेली दिसत आहे.


मानवी मनाने सत्य ज्ञानाच्या अभावी अज्ञानात देव, धर्म, देश, कुटुंब इत्यादी मानसिक व्यवस्था बनविल्या आहेत.


जे सत्य नाही आणि जे केवळ काल्पनिक आहे त्याच्या हव्यास पोटी दुःख निर्मिती होत असते.


संपूर्ण विश्व निष्प्राण आहे आणि आपली पृथ्वी सजीव सृष्टी ने नटली आहे. अपघाताने जे आयुष्य मिळाले आहे ते इतरांना न दुखावता समाधानाने जगावे.


सत्य इतके साधे सुधे आहे. धर्मांध नेत्यांनी त्याला अवास्तव केले आहे कारण आपणास सुद्धा ते अज्ञान हवे हवेसे असते. Hangover चे दुःख झाले तरी परत तेच हवे असते, असे आपले मन आहे आणि अशा हव्यासी मनाला सत्य नको असते.


आताही अनेक तथाकथित ज्ञानी हे चार अवस्था नीरास करून ब्रम्ह अवस्था प्राप्त करण्याच्या गोष्टी सांगत असतात आणि शेकडो लोक त्यांचे अनुयायी बनतात. आताच्या आधुनिक जगात असे अज्ञानी लोक असतील तर हजारो वर्षा पूर्वीच्या समाजाची कल्पना करावी.


त्यावेळी सुद्धा चार्वाक सारखे ज्ञानी हे लोकांना सत्य काय असते ते सांगत होते परंतु श्रद्धेचा पगडा अज्ञानी समाजावर अधिक असतो. चार्वाक तत्वज्ञान नामशेष झाले आहे. अलीकडील कृष्णमूर्ती यांचे तत्वज्ञान सुद्धा अतिशय कमी लोक समजून घेतात.


शून्य अवस्था, thoughtless state, संकल्प विकल्प रहित अवस्था म्हणजे विचार संपूर्ण बंद होणे नसते. तर आपल्यावर धार्मिक, सामाजिक, कौटुंबिक असे जे काही मानसिक संस्कार झाले आहेत ते सर्व भ्रामक आहेत, याचे आकलन होणे असते.


या आकलनात कुटुंब, समाज, देश, धर्म, देव यांच्या सारख्या मानसिक कल्पना निकालात निघतात आणि त्या बरोबर त्यांचे विचार शून्य होतात.


अनावश्यक विचार बंद होणे आणि फक्त जीवनावश्यक विचार करणे याला शून्य अवस्था म्हणता येईल.


समजा एखाद्याला देश हि एक भ्रामक कल्पना आहे याचे आकलन झाले आहे तरी त्याला व्यवहारासाठी देशाचे नागरिकत्व स्वीकारावे लागते, त्या देशाचे कायदे पालन करावे लागतात. तसेच देव, धर्म, समाज, कुटुंब यांच्याशी बाह्य संबंध ठेवून अंतर्यामी अलिप्त राहता येते.

 
 
 

Recent Posts

See All
अखंड सावधानता

मी हा अतिशय खोलवर रुजलेला भ्रम आहे. अनेकांना याचा पत्ताच नसतो. हा जो भ्रामक, असत्य मी आहे तो स्वतःच आपला मालक बनतो. आणि जेव्हा मी हा मालक...

 
 
 

Comments


Mobile Phone: 9987145556, email: viyoddha@gmail.com

©2022 by Viyoddha. Proudly created with Wix.com

bottom of page