top of page

अंतर्दृष्टी

Mar 7, 2023
1 min read

मानवी विचार कितीही महान असले तरी ते संकुचित असतात. प्रत्येक संकुचित वस्तू स्वतःला महान बनविण्याचा प्रयत्न करत असते.


मानवी विचार स्वतःचे संकुचित स्वरूप झाकण्यासाठी पोकळ विशाल कल्पना रचीत राहते. संकुचित विचार जे काही कल्पना करते ते सर्व त्याच्या संकुचित मर्यादेच्या बाहेर जाऊ शकत नाही. परंतु स्वतः विचारांना त्यांचे संकुचित स्वरूप कधीच लक्षात येत नसते. विचार हे नेहमी मानवी असतात त्यांना उगाच अमानवी, अपौरुषेय, दैवी असे स्वरूप दिले जाते.


ज्या मानवाला याचे आकलन होते ते आकलन त्याला अंतर्दृष्टी द्वारे प्राप्त होत असते. हि अंतर्दृष्टी त्याच्या संकुचित विचारांचा अंत करते आणि खऱ्या अर्थाने त्याचे जीवन सुंदर करते.


अंतर्दृष्टी हि विचारातून निर्माण होत नसते, ती पूर्व स्मृती किंवा पूर्व माहिती संग्रह मधून येत नसते. ती प्रत्यक्ष अनुभूती असते.


सर्व प्रकारची मानसिक बंधने (कुटुंब, समाज, देश, धर्म, गुरू, ग्रंथ, ईश्वर वगैरे) शेवटी दुःख निर्माण करतात याचे आकलन होणे म्हणजे सुद्धा अंतर्दृष्टी असते. सर्व मानसिक कल्पना या विचारांच्या हालचाली असतात, अंतर्दृष्टी अशा सर्व हालचाली नष्ट करते.


सारासार विवेक बुद्धी सुद्धा अंतर्दृष्टी असते.



Recent Posts

See All
समस्या सत्य नसतात

सर्व मानवी समस्या ह्या मानसिक समस्या असतात म्हणून त्या खऱ्या नसतात, म्हणजे मुळात समस्या ह्या नसतातच !!! जी व्यक्ती त्याच्या जीवनात सतत...

 
 
 

Comments


Mobile Phone: 9987145556, email: viyoddha@gmail.com

©2022 by Viyoddha. Proudly created with Wix.com

bottom of page