ज्ञान दीपावली
अनामिक भीती पोटी आपण काहीतरी अज्ञात शक्ती असावी आणि तिच्या मदत प्राप्तीसाठी आपण काहीतरी करायला हवे अशी सहज भावना निर्माण होते.
काय करायचे ते माहिती नसते म्हणून मग इतरांच्या शिकवणुकीचा (पूर्वीची whatsapp University) आंधळे पणाने पालन करायचे या समाज धारणेतून, आपण आपली तशीच मानसिक धारणा बनविलेली असते.
कोणतीही शक्ती कोणालाही मदत करत नसते, प्रत्येकाला आपले ओझे स्वतःच वहायचे असते. याच्या आकलनात भीती दूर होते, अज्ञान नाहीसे होते.
जीवनातील अंधार दूर झाला की प्रकाश तेथेच होता याची तत्क्षणी प्रचिती येते. या प्रचिती नंतरचे म्हणजेच ज्ञान प्राप्ती नंतरचे जीवन कवीने मार्मिक शब्दात व्यक्त केले आहेत:
फिटे अंधाराचे जाळे, झाले मोकळे आकाश
दरीखोर्यातून वाहे एक प्रकाश, प्रकाश
रान जागे झाले सारे, पायवाटा जाग्या झाल्या
सूर्य जन्मता डोंगरी, संगे जागल्या सावल्या
एक अनोखे लावण्य, आले भरास भरास
दव पिऊन नवेली झाली, गवताची पाती
गाणी जुनीच नव्याने आली पाखरांच्या ओठी
क्षणापुर्वीचे पालटे, जग उदास उदास
झाला आजचा प्रकाश, जुना कालचा काळोख
चांदण्याला किरणांचा, सोनसळी अभिषेक
सारे रोजचे तरी, ही नवा सुवास सुवास




Comments