top of page

ध्यान, विवेक, मुक्ती

Oct 21, 2022
2 min read

आपण नेहमी आपल्या सध्याच्या परिस्थिती मध्ये असमाधानी असतो. आपणास नेहमी दूरचे डोंगर साजरे दिसत असतात. आताच्या परिस्थिती मधून दुसऱ्या परिस्थिती मध्ये जाताना नेहमी संघर्ष करावा लागतो आणि यामुळे आपले सर्वांचे जीवन हे एक संघर्ष बनले आहे.


मानवी संस्कृती, संस्कार, थोरा मोठ्यांचे उपदेश सुद्धा आपणास सतत मृगजळचा पाठलाग करण्यास भाग पाडत असतात. जीवघेण्या स्पर्धेत सर्वांना भाग घेणे क्रमप्राप्त ठरते. भौतिक जीवनातील इच्छा प्राप्त करून झाल्या की नंतर अध्यात्मिक मोक्षाची तयारी सुरू होते. अर्थ, काम, मोक्ष हे धर्माची मूलतत्वे झाली आहेत आणि त्यांना प्राप्त करणे हाच पुरुषार्थ ठरविला गेला आहे. जगभरातील सर्वजण याच मार्गाने जात असतात आणि असेच संघर्षपूर्ण जीवन जगत असतात. जीवन जगण्याचा हाच एक आकृतीबंध ठरला गेला आहे. सर्वजण तेच करत असतात त्यामुळे या आकृतीबंध मध्ये आपली मने programmed झाली आहेत. त्यामध्ये काही चुकीचे असावे हा विचार सुद्धा कोणी करू शकत नाही.


जेथे विचार पूर्वग्रहदूषित असतात तेथे प्रज्ञेचा शिरकाव नाकारला जातो.


विवेक, प्रज्ञा म्हणजे सार आणि असार यातील फरक ओळखणे असते, समजून घेणे असते आणि त्यातूनच कृती करणे असते.


विवेकी प्रज्ञा जीवनातील सर्व संघर्षाचा अंत करते.


हजारो वर्षे माणूस संघर्षात का आहे याचे निरीक्षण केवळ सूक्ष्म विवेक बुद्धी लाभलेले मन करू शकते.


आमच्याकडे भरपूर ज्ञान आणि अनेक थोर मार्गदर्शक आहेत. पण त्यांनी आम्हाला मानवी संघर्ष संपवायला मदत केली नाही.


दुसर्‍याचे अनुसरण करणे म्हणजे आपली स्वतःची बुद्धिमत्ता नाकारने असते. तल्लख बुद्धी हे सुद्धा ओळखते की कालबद्ध योजना मानवी संघर्ष थांबवू शकत नाही.


जो मनुष्य काळ, भूतकाळातील ज्ञान आणि मार्गदर्शन नाकारतो तोच सर्वमान्य जुना ठराविक साच्याचा आकृतीबंध मोडून काढू शकतो.


जुने म्हणजे सोने नसते, याचे आकलन होणे म्हणजेच तडक निर्णय असतो. प्रत्यक्ष स्वतःस झालेले आकलन हेच जीवनातील अज्ञान आणि सर्व संघर्ष संपवते. हे आकलन काळावर आधारित असू शकत नाही, भूतकाळातील ज्ञानावर आधारित असू शकत नाही. कोणाच्या मार्गदर्शनाने होवू शकत नाही.


विचार हे देखील कालबद्ध असतात. विचार आणि काळ हे दोन्ही एकमेकांवर आधारित आहेत.


शब्दांशिवाय, नाम न घेता आणि स्मरण न करता आपण पाहू शकतो का? अगदी पहिल्यांदा बघितल्यासारखं? याचा अर्थ पूर्ण ध्यान देणे होय. (मी पणाच्या केंद्राकडून लक्ष देणे नाही). या अशा ध्यानात काळाला स्थान नसते.


जेव्हा काळ नसतो तेव्हा विचार, पूर्वज्ञान, मार्गदर्शनही नसते. आणि या ध्याना मुळे जुना पारंपरिक आकृतीबंध मोडला जातो.


ध्यान अपूर्व संवेदनशीलता आणते, विलक्षण चैतन्य देते. शुद्ध धारणा वेगळ्या प्रकारची ऊर्जा निर्माण करते जी काळ आणि विचारांशी संबंधित नसते.






Recent Posts

See All
अखंड सावधानता

मी हा अतिशय खोलवर रुजलेला भ्रम आहे. अनेकांना याचा पत्ताच नसतो. हा जो भ्रामक, असत्य मी आहे तो स्वतःच आपला मालक बनतो. आणि जेव्हा मी हा मालक...

 
 
 

Comments


Mobile Phone: 9987145556, email: viyoddha@gmail.com

©2022 by Viyoddha. Proudly created with Wix.com

bottom of page