top of page

मुक्ती म्हणजे सर्व बंधनातून मुक्त होणे होय

Oct 27, 2022
2 min read

आपले कुटुंब, आपला धर्म, आपला देश, आपला समाज किंवा आपले घर, आपली स्थावर जंगम मालमत्ता हे सर्व आपणास बंधनात टाकत असतात. कारण त्यांच्याशी असलेले आपले संबंध आपणास मुक्त होण्यापासून अडथळा निर्माण करत असतात.


आपले विचार हे आपण संलग्न असलेल्या समुदायद्वारे संमोहित केले जातात. संमोहन आपल्या तर्कशक्तीला प्रतिबंधित करत असते.


आपली सर्व दैनंदिन कामे हि विचारांवर आधारित असतात. विचार हा नेहमीच मर्यादित असतो कारण तो मर्यादित ज्ञानाचा परिणाम आहे, तो नेहमी भूतकाळ असतो, तो कालबद्ध असतो, विचार ही काळाची हालचाल असते.


नातेसंबंध म्हणजे एखादी व्यक्ती किंवा एखादी वस्तू यांच्या बाबत विचारांची कालबद्ध हालचाल असते. संवेदना, भावना, साहचर्य या सर्व गोष्टी भूतकाळातील स्मृती आणि स्मृतीतून निर्माण होणाऱ्या विचारांवर आधारित असतात. विचार स्वतः मर्यादित असल्यामुळे इतरांशी असलेले आपले सर्व संबंधही मर्यादित असतात परिणामी नात्यामध्ये संघर्ष निर्माण होतात.


विचारांचे मूळ समजून घेण्यासाठी मेंदू आठवण नोंद कशासाठी करतो ते पाहावे लागेल. मेंदू स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी नोंद करत असतो कारण सुरक्षितते शिवाय मेंदू योग्यरित्या कार्य करू शकत नाही. असुरक्षित असल्याने मेंदू इतर गुरुंचा अधिकार स्वीकारतो.


संलग्नतता मध्ये विभक्तता अंगभूत असते आणि विभक्ततेमध्ये संघर्ष अंगभूत असतो.


जेव्हा आपण इतरांशी संलग्न होणे बंद करतो तेव्हा आपण ध्यान करण्यास मोकळे होत असतो. बंधने नसल्यामुळे ध्यान शक्य होते.


आपल्या जवळचे संबंध प्रथम तपासा त्यात दडलेले सत्य सहज हाती लागू शकते. दूरचे स्वर्गातले संबंध तपासायला जाल तर काहीच हाती लागणार नाही.


आपण इतरांशी संबंध का ठेवतो? कारण आपण आतून एकटे असतो आणि मानसिकदृष्ट्या रिकामे असण्याची भीती वाटते. आपण मुळात जे एकटे आहोत त्यातून ही सुटका असते. आपल्याला एकटेपणाची भीती वाटते म्हणून आपण सुरक्षिततेसाठी इतरांशी जोडले जातो.


एकटे राहण्यास नेमकी कोणाला भीती वाटते? तो मी नेमका कोण आहे? तो मी हा शब्दांचा, भाषेची निर्मिती नाही का? तो मी म्हणजे मर्यादित विचार नाही काय? आपला मी हा या मर्यादित विचारसरणीचा भाग आहे. सर्वोच्च आणि परिपूर्ण ईश्वरीय संकल्पना देखील या संकुचित विचारांचा भाग आहेत.


जेव्हा आपण शब्द, स्मृती आणि विचार यांना आपल्या पासून काढून टाकतो तेव्हा जे उरते ते पूर्णपणे रिकामे शून्य असते.


जर मनाने त्या शून्यतेचे निरपेक्ष निरीक्षण करून त्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केला नाही तर नाते शिवाय संबंध राहू शकतात.


प्रवासात आपली एखाद्या अनोळख्या व्यक्तीशी चांगली मैत्री होते, परंतु प्रवास संपला की नाते संपते.



Comments


Mobile Phone: 9987145556, email: viyoddha@gmail.com

©2022 by Viyoddha. Proudly created with Wix.com

bottom of page