top of page

संघर्ष मुक्त जीवन

Nov 9, 2022
2 min read

जीवनात इतरांशी संघर्ष न करण्याचा निर्णय जेव्हा आपण घेतो तेव्हा त्या निर्णयाचा अर्थ असा असतो की आपल्या जीवनात संघर्ष आहे.


सर्वांच्या जीवनात संघर्ष हा असतोच असे आपण मान्य केलेले असले तरी आपल्या जीवनात आपणास संघर्ष नको असतो.


यासाठी संघर्षाचे स्वरूप, त्याची रचना आणि तो का अस्तित्वात आहे त्याचे अवलोकन करावे लागते. संघर्ष हा असतोच त्यातून मुक्त होण्यासाठी त्यास सामोरे जावे लागते आणि त्याचे विसर्जन करावे लागते.


जर एखादा त्यात खोलवर गेला असेल, त्याने नातीगोती आणि मित्र परिवार या संबंधात ते अतिशय काळजीपूर्वक पाहिले असेल, तर त्याला असे दिसेल की मानवी संघर्ष हा लाखो वर्षांपासून अस्तित्वात आहे. उत्क्रांती मध्ये जगण्यासाठी संघर्ष हा अधोरेखित झालेला आहे.


एखाद्याचे मन संघर्षापासून स्वतः मुक्त होवू शकते काय?


होय ते शक्य आहे. जर त्याच्या मनात इतरांशी संबंध ठेवताना देव, देश, धर्म, समाज, कुटुंब याबाबत कोणताही पूर्वग्रह नसेल, दुराभिमान नसेल तसेच रीती रीवाजांचे बंधन नसेल तर असे मन खरोखर स्वतः मुक्त आहे, ते बंदिस्त झालेले नाही. अशा मनाला संघर्षाचा काहीच त्रास होत नाही.


असा स्वतः संघर्ष मुक्त झालेला जीव असेल तर तो लगेचच त्याचे संघर्ष सोडवू शकतो, इतरांना ते शक्य होत नसते.


- J. Krishnamurti Online


If you decide not to have conflict, the very decision implies conflict. See the nature of conflict, the structure, and why it exists. If you have gone into it, if you have observed it very carefully in relationship with people and the world, you see conflict has existed for millions of years.


Is it possible to be free of conflict? It comes, but to be free of it and face it and dissolve it.


A mind that is not in conflict can resolve conflict immediately – not the other way around. That is, if one’s mind is free from conflict, if that is possible – and it is possible, in our relationship with each other, having no nationality, no prejudice and not committed to any formula or conclusion – then the mind is really free, not conditioned. Then the mind itself has no problems.


From Interview by Roy Tuckman, Ojai, 17 March 1983

Comments


Mobile Phone: 9987145556, email: viyoddha@gmail.com

©2022 by Viyoddha. Proudly created with Wix.com

bottom of page